चिखली (हॅलो बुलडाणा) आमदार श्वेता ताई महाले यांच्या पुढाकारातून चिखली नगरपरिषदेत 2025- 26 या शैक्षणिक सत्रापासून नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये इयत्ता पहिली पासून सेमी इंग्रजीचा वर्ग सुरू करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला आहे.
समाजातील सर्वसामान्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आम. श्वेता ताई महाले यांनी माय मराठीचा मान ठेवत इंग्रजी माध्यमातूनही शिक्षणाची व्यवस्था नगर परिषदेच्या शाळेमधून करावी अशी सूचना केली होती.दरम्यान नगर परिषदेने 2025- 26 या शैक्षणिक सत्रापासून सेमी इंग्रजीचा वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नगरपरिषद शाळेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, प्रवेशासह, गणवेश, पाठ्यपुस्तके,बूट मोजे, स्कुल बॅग इत्यादी सर्व सामग्री मोफत देण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे इंग्रजी माध्यमातून शिकवण्यासाठी उच्चशिक्षित, तज्ञ, कुशल व प्रशिक्षित अनुभवी शिक्षक वृंद नेमण्याची आणी कृतियुक्त, समावेशित व आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांचा विकास घडावा यासाठी सर्व शासकीय पाठबळ आणि सर्व शक्य ती मदत करण्याचे आश्वासन आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी दिले आहे.