बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आशिया खंडात नावलौकिक असलेल्या बुलढाणा अर्बन बँकच्या वेअर हाऊस योजनेचा केरळमध्ये सुद्धा बोलबाला आहे. नुकतेच esaf स्मॉल फायनान्स बँकेच्या त्रिसूर (केरळ ) येथील एका कार्यक्रमात रिझर्व बँकेचे डायरेक्टर श्री सतीश मराठे यांनी बुलढाणा अर्बनच्या वेअर हाऊस योजनेचा सन्मानपूर्वक उल्लेख करत गौरव केला आहे.
बुलढाणा अर्बन देशाची शेतीप्रधान संस्कृती जपत जोपासत आहे. बुलढाणा अर्बन च्या अनेक योजनांनी हजारो नागरिकांना, शेतकऱ्यांना उभारी दिली आणि देत आहे. वेअर हाऊस च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी प्राप्त होत आहे. आता बुलढाणा अर्बन चा केरळमध्ये सुद्धा esaf स्मॉल फायनान्स बँकेच्या त्रिसूर (केरळ ) येथील एका कार्यक्रमात रिझर्व बँकेचे डायरेक्टर श्री सतीश मराठे यांनी गौरवपूर्ण उल्लेख केल्याने बुलढाणा अर्बन कौतुकास पात्र ठरत आहे.