बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘हॅलो बुलढाणा’चे मालक तथा संपादक जितेंद्र कायस्थ यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप करीत त्यांच्या मुलाला देखील ब्लॅकमेलर म्हणून mh 28news या बोगस वेबपोर्टल वरून सोशल मीडियावर बदनामीकारक वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, मानहानीचा दावा देखील ठोकणार आहे.सदर न्यूज पोर्टल चे मालक दीपक शेळके हे सन 2021-22 पर्यंत चालवीत होते मात्र त्या नंतर आता कुणी या पोर्टलवरून सदर बदनामीकारक वृत्त प्रसारित करण्याचा बोगसपणा केला? याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे.
आमदार श्वेता ताई महाले यांच्या कार्यालयातून आलेल्या विधान विधानसभेतील अभिभाषणाच्या व्हिडिओमधील चूक ‘हॅलो बुलढाणा’ वेब न्यूज पोर्टलने वृत्त प्रसारित करून लक्षात आणून दिली होती. दरम्यान या वृत्तामुळे चिडलेल्या बोगस mh28news वेब पोर्टलच्या माध्यमातून कुणी तरी ‘हॅलो बुलढाणा’च्या संपादकांवर खंडणीखोरीसह अनेक बिनबुडाचे आरोप करीत बदनामीकारक वृत्त सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. सन 2021 22 मध्ये mh28news वेब पोर्टलचे मालक दीपक शेळके होते.त्यानंतर त्यांनी या पोर्टलशी आपला संबंध नसल्याचे जितेंद्र कायस्थ यांना पत्रानुसार कळविले आहे.दरम्यान या mh28news वेब पोर्टलवरून मग भामट्याने बदनामीकारक बातमी सोडली..कुणी ही स्क्रिप्ट लिहिली ?..दुसऱ्याच्या नावावर बातमी लावण्याचा हा प्रकार कधीपासून सुरू आहे ? यामागे कोणती टोळी आहे का? या टोळीचा म्होरक्या कोण? याचा शोध आता सायबर पोलीस घेणार आहेत.