बुलडाणा (हॅलो बुलडाणा) येथील जिल्हा परिषद शाळेला ८ मार्चच्य रात्री दहा वाजता अचानक आग लागली होती.परिसरातील लोकांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला परंतु आग अधिकाधिक भडकतच होती.. यावेळी उपस्थित असलेले प्रकाश डोंगरे यांच्यातील फायर फायटर जागी होऊन त्यांनी लगेच आपला स्वतः चा जीव धोक्यात घालून कुठलाही विचार न करता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘अग्निविर’ म्हणून ते धावून गेले.
या घटने प्रसंगी प्रकाश डोंगरे यांच्यातील वेगळे स्वरूप यावेळी बघायला मिळाले!
या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जनतेने प्रकाशभाऊ यांचे आभार मानले तसेच त्यांनी दाखवलेल्या तत्परतेचे तसेच धाडसी वृत्तीचे कौतुक केले.