मेहकर (हॅलो बुलडाणा) शंकरपटाचा थरार म्हणजे बैलांच्या शर्यतींमध्ये होणारा रोमांचक आणि चुरशीचा लढा! असाच चित्तथरारक शंकरपट श्री खंडोबा यात्रेनिमित्त हिवरा खुर्द तालुका मेहकर येथे आयोजित करण्यात आला. शिवसेना नेते किशोर पाटील गव्हाड व अंबिका महिला अर्बनचे अध्यक्ष युवानेते मोहनभैया धोटे यांच्या हस्ते ८ मार्च रोजी हिवरा खुर्द – अंबाशी रस्त्यावरील मैदानावर थाटात उद्घाटन करण्यात आले आहे.
शंकरपट ही स्पर्धा 2 गटात होणार आहे. यावेळी हिवरा खुर्द येथील सरपंच संजय उतपुरे पोलीस पाटील मनोहर गाडे, भास्करजी शिंदे, पत्रकार अमर राऊत तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुभाष शिंदे भगवान गायकवाड, डिगू पाटील, पंढरी गायकवाड, गजानन खरात, अमोल खेंनते, दत्ता वाळके, कैलास खरात, सचिन गवई, मदन राठोड, जगन्नाथ खेनते, विनोद वाकळे, भगवान ढवळे, शिवाजी ढवळे, अंबादास गायकवाड, रमेश नाना बनकर माधव झरे, दिनकर मुडे, माधव दहिभाते डॉ संजय खरात,बाळु सरदार घुटी माधवराव दळवी, साहेबराव वाळके, अंकुश लंबे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.