बुलढाणा (हॅलो बुलडाणा) उन्हाळ्याची चाहूल लागली की आगीच्या घटनांमध्ये वाढ होवू लागते मात्र सध्या उन्हाळ्याची चाहूल सुरु झाली असतांनाच आग लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आता थोड्यावेळपूर्वीच बुलढाणा जिल्हा परिषद जवळ असलेल्या झेडपी स्कूलमध्ये अचानक जुन्या इमारत असलेल्या खोलीला भीषण आग लागली आहे.झेडपी स्कूल मधील इमारतीला अचानक आग लागली आणि काही वेळातच आगीच्या ज्वाळा भडभडू लागल्या. दरम्यान नगरपालिकेचे अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचलेले आहे. आणि आग विझवण्याचा परिपूर्ण प्रयत्न सुरू आहे.
- Hellobuldana