बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना महापुरुषांची नावे घेऊन भाषणाला सुरुवात करण्याची परंपरा आहे.परंतु आपण काय बोलतो याचे त्यांना भान देखील राहत नाही.चिखलीच्या महिला आमदार श्वेताताई महाले यांनी सुरुवातीलाच बोलतांना राष्ट्रमाता जिजाऊं व अहिल्यादेवींचा एकेरी उल्लेख केल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मा.राज्यपालांच्या अभिभाषणाच्या समर्थनार्थ चर्चेसाठी उभी असल्याचे सांगत,आमदार श्वेता ताई यांनी बोलण्यास सुरुवात केली. “शाहू- फुले- आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जिजाऊ.. अहिल्या.. रमा म्हणत पॉस घेतला आणि पुन्हा रमाबाई.. सावित्रीबाई म्हणत त्यांनी भाषण कंटिन्यू ठेवले.” मात्र माँ जिजाऊं सावित्रीबाई, रमाबाईंच्या या आमदार लेकीने राष्ट्रमाता जिजाऊं व अहिल्यादेवींचा एकेरी उल्लेख करावा, हे पटण्यासारखे नाही. राष्ट्रमाता जिजाऊंनी महाराष्ट्राचा गौरवशाली ‘शिवइतिहास’ घडविला तर भारतातील माळव्याच्या ‘तत्त्वज्ञानी महाराणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्भय राणी म्हणून अधिराज्य गाजवले. त्यांचा ऐकरी भाषेत उल्लेख करणे कितपत योग्य आहे? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.