spot_img
spot_img

💥इम्पॅक्ट! ‘हॅलो बुलडाणा’ च्या दणक्याने ‘गोंद तस्करी उघड!’ – 4 तस्कर वनविभागाच्या जाळ्यात!

संग्रामपूर (हॅलो बुलडाणा) चौफेर नजर ठेवून ‘हॅलो बुलढाणा’ सत्याचा साक्षीदार म्हणून वृत्त प्रसारीत करते..ही कर्तव्यनिष्ठा असल्याने दररोज सडेतोड बातम्या उमटतात..त्या परिणामकारक देखील ठरतात.. ‘सातपुडा जळतोय! डिंक माफीयाकडून जंगल पेटवण्याचा धक्कादायक प्रकार’ ही बातमी देखील नुकतीच उमटल्याने संग्रामपूर तालुक्यात सलईगोंद तस्करी उघड होवून 4 तस्कर जाळ्यात अडकले आहेत.

‘हॅलो बुलढाणा’ ने या परिसरातील अवैध गोंद तस्करी चे जळजळीत वास्तव मांडले होते.दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी सतर्क झाले होते.दरम्यान बेकायदा सलई गोंद वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 103 किलो गोंद जप्त करण्यात आला. सोनाळा वन्यजिव विभागाने टूनकी ते लाडनापुर रस्त्यावर नाकाबंदी करून ही कारवाई केली.
‘हॅलो बुलढाणा’ने याआधीच जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून डिंक तस्करांकडून जंगल पेटवण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे संकेत दिले होते. शिवाय वणव्यांमुळे लाखोंची वनसंपत्ती भस्मसात होत असून,अनेक वन्यप्राण्यांचे जिवंत जळून मृत्यू होत असल्याचे वास्तव देखील अधोरेखित केले होते. याकडे देखील वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!