बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा 2025 च्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक 4 मार्च 2025 रोजी शासकीय विश्राम भवानी येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती 2025 चे विद्यमान अध्यक्ष निलेश राऊत हे होते. यावेळी दिनांक 11 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यात आली व यातून सर्वांचे मत जाणून घेतली यावर्षीची जयंती उत्सव हा भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून त्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले. यासाठी सार्वजनिक उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव 2025 समितीच्या कार्याध्यक्ष पदी अर्चित हिरोळे तर सचिव पदी पत्रकार दीपक मोरे, कोषाध्यक्षपदी अमोल वाठोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी बैठकीस राहुल कासारे,अमोल खरे ,कुणाल पैठणकर, सिद्धार्थ आराख, प्रेम इंगळे, निलेश गायकवाड, सनी पैठणे, सुरेश सरकटे, अजय जाधव, स्वप्निल कासारे, सुरज सोनवणे, ऋषिकेश जाधव यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.
- Hellobuldana