spot_img
spot_img

💥सायबर क्राईम! “पी.एम.किसान एपीके” लिंक उघडताच शेतक-यांची बँक खाती होताहेत रिकामी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) १५ जून २०२३ अन्वये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषिविभागा मार्फत राबविण्यात येत आहे.या योजने अंतर्गत शेतक-यांच्या मोबाईल वर PM Kisan list. APK किंवा PM Kisan.APK Message ची लिंक उघडताच शेतक-यांच्या बँक खात्यात जमा असलेली रक्कम गायब होत असल्याचे इतर जिल्ह्यात निदर्शनास आलेले आहे.

तरी शेतक-यांनी मोबाईल वर PM Kisan list. APK लिंक PM Kisan.APK या Message ची लिंक उघडू नये किवा सदर लिंक चा वापर शेतक-यांनी करू नये, त्या ऐवजी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत https://pmkisan.gov.in/ पोर्टल चा वापर करावा तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन मनोजकुमार ढगे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!