देऊळघाट (हॅलो बुलडाणा/ इमरान खान) येथील काही स्वस्त धान्य दुकानदार मनमर्जीने व दादागीरीने कारभार करीत असून, शिधा पत्रीका धारकांना त्रास देताहेत. अन्नधान्य युनिटप्रमाणे देत नसून धान्य काळ्या बाजारात
विकल्या जात असल्याचा आरोप रिजवान खान उस्मान खान यांनी केला आहे.अनेक दुकानदार शिधा पत्री काधारकांना दुकानदार अन्नधान्य देत नाही तर इपॉस मशिनव्दारे थंब दिल्यावर लाभार्थ्यांना दुकानदार पावती सुद्धा देत नाहीत. दुकानात रेट बोर्ड लावत नाही. माहिती विचारली की,कायमस्वरुपी रेशनकार्ड रद्द करण्यात येईल. अशी धमकी देतात, असे तक्रारीत म्हटले आहे. राशन दुकानदारांना शासकीय दुकानातुन किती प्रमाणात अन्न धान्य मिळते व ते दुकानदार किती प्रमाणात किती अन्न धान्य वाटप करते व किती शिल्लक राहते व राहलेल्या अन्नधान्य शासकीय धान्य गोडाऊनमध्ये जमा केले जाते किंवा नाही. याबाबत शासकीय समीती नेमवुन संबधित स्वस्त धान्य दुकानदाराविरुध्द पुरवठा कार्यालयाच्या कायद्या अंतर्गत कडक कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी, तसेच बुलडाणा तालुक्यातील ज्या निंलबित रजेवर गेलेल्या रेशन दुकानदार कोणत्या वर्षापासुन कोणत्या राशन दुकानदारांना जोडण्यात आलेली आहे? त्याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश व्हावे, आदी मागण्या रिजवान खान उस्मान खान यांनी केल्या आहेत. ८ दिवसाच्या आत तक्रार अर्जावर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.