spot_img
spot_img

💥डोणगावात ‘एक्का बादशहा!’ – ‘खाकी’ची काही लाज?’

डोणगाव (हॅलो बुलडाणा) डोणगावात ‘खाकीची’ लाज बाळगणारे दिसून येत नसल्याचा आरोप होतोय. कारण पोलिसांच्या आशीर्वादाने सगळे अवैध धंदे तेजीत सुरु आहे.

मटका, जुगार, अँपेरिक्षांची बेकायदा वाहतूक, सोरट, वाळूची चोरटी वाहतूक, आदी अवैध धंदे तेजीत सुरू असताना पोलिस अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत. अवैध धंद्यांवर कारवाईचा फास आवळण्यात महत्त्वाची भूमिका असलेली स्थानिक गुन्हे शाखा वसुलीच्या कामात गर्क असल्याचाही आरोप होतोय!

ग्रामीण भागात व शहरात धूम स्टाइलने महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणे, जबरी चोर्‍या व घरफोड्या हे गुन्हे नित्याचे झाले आहेत.या गुन्हेगारीला शहरातील जुगार मटका साथ देत असून हा धंदा जोरात सुरू आहे. संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण पुरवण्यात येत असल्याचा नागरिक आरोप करीत आहे. डोणगावात स्थानिक पोलिस व एलसीबी संगनमत करून खुलेआम मटका चालवतात. शहरात अनेक टपर्‍यांवर मटका सुरू आहे. कारवाईत सातत्य नसल्याने या टपर्‍या जोरात सुरू असून, अनेक जण कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. ठरावीक रक्कम दरमहा पोहोच केली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. राजरोसपणे जुगार सुरू असताना पोलिस दुर्लक्ष करतात. एलसीबी पथकाने या अड्डय़ांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी याकडे लक्ष द्यावे अशी ही मागणी होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!