बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आका म्हणजे आलादिन जीन मधून निघालेला आज्ञार्थी! बुलढाण्यात काही आका आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर अवैध धंदे चालताहेत..हा प्रश्न रेतीच्या तस्करीतून पुढे आलाय.. इरला येथील रेती वाहतूक स्पर्धेतून उमेश फदाट याचा खून झाला होता. त्यांची पत्नी अनुराधा हीने आता नव्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे तक्रार मांडली आहे.याप्रकरणी बोलताना,बंटी दादा सपकाळ यांनी बुलढाण्यातील आकाला चांगलेच फाईलवर घेतले आहे.
इरला खून प्रकरणी आरोपींच्या विरोधात मृतकाच्या पत्नीने घटनाक्रम प्रशासनाकडे व काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडे मांडला आहे.यामध्ये म्हटले आहे की, हा अवैध रेतीचा प्रकार थांबवण्यासाठी तहसीलदार यांनी तस्करीच्या जागेवर चर खोदला होता. जेणेकरून टिप्पर रेती उपसा करण्यासाठी येऊ शकणार नाही. परंतु बुलढाण्यातील आका च्या हस्तकांनी हा चर बुजवून रेती तस्करी सुरू केली आहे.सदर खून प्रकरणातील डेड बॉडी आकानेच मॅनेज करतो म्हणून सांगून बुलढाण्यात आणून टाकली. शिवाय रेती तस्करी करणाऱ्या वाहनांवर धर्मवीर किंवा संभाजी रक्षक असा नामोल्लेख आढळून येतो. त्यामुळे या महापुरुषांच्या नावावर कोणी आडवा यायचे नाही वेळ प्रसंगी त्यांना चिरडून टाका असा आदेशच या आकाने दिल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.हिवाळी अधिवेशनात बुलढाण्यातील अवैध धंद्यांवर प्रश्न उचलण्यात आला होता.आठ दिवस धंदे बंद झाले. नव्याने हप्ता वाढवून आता बुलडाणा शहरापासून पूर्ण बुलडाणा जिल्ह्यात राजरोसपणे अवैध धंदे जोमात सुरू आहेत. पोलिस यंत्रणाही निद्रिस्त आहे. असाही आरोप करण्यात आला आहे.