बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेगाव व खामगाव तालुक्यातील 300 जणांची केसगळती झाली.या प्रकरणी संशोधक तथा पद्मश्री प्राप्त डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनी पंजाबच्या गव्हाचे कारण पुढे ठेवले. दरम्यान एका ब्रेक्रिंग वृत्त पोर्टलने शास्त्रज्ञ बावस्कर यांची ‘स्वस्तात प्रसिद्धी लाटण्याचा प्रकार म्हणून खिल्ली उडवली होती. यावर जिल्हा यंत्रणांनी सुद्धा जोर दिला. परंतू महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.’जिल्हाधिकाऱ्यांनी खासदार व मंत्र्यांनी एक महिना हा पंजाबचा गहू खावून दाखवावा’ असे थेट आवाहनच केले आहे.
जिल्ह्यातील तब्बल 15 गावांमधील 300 हून अधिक लोक टक्कल बाधित झाले. यामागे पंजाबहून आलेल्या गव्हाचा संबंध असल्याचा दावा पद्मश्री पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध फिजिशियन डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केलाय. डॉ. बावस्कर यांनी महिनाभर संशोधन करून धक्कादायक निष्कर्ष मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत मिळणाऱ्या गव्हात सेलेनियम या घटकाची मात्रा अत्यधिक प्रमाणात आढळून आली आहे, तर जस्त (झिंक) कमतरतेत आढळले आहे.
ही समस्या उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. याशिवाय, ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) च्या शास्त्रज्ञांनीही पाणी व मातीचे नमुने गोळा करून तपासणी केली. तपासणीतही या भागातील प्रभावित लोकांच्या रक्तात सेलेनियमची पातळी जास्त असल्याची पुष्टी झाली आहे. डॉ. बावस्कर यांनी भोनगावातील सरपंचाच्या घरातील गहू तपासला असता, त्यात मेटॅलॉईड धातू आढळला. शरीरासाठी सेलेनियम आवश्यक असले तरी त्याचे अति प्रमाण धोकादायक ठरू शकते, असे तज्ञ म्हणतात. ICMR ने केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला आहे, मात्र तपशील अद्याप उघड करण्यात आलेले नाहीत. दरम्यान जिल्हाधिकारी, खासदार किंवा मंत्र्यांनी या प्रकरणी काही ठोस पावले उचलले नाही. संशोधनापूर्वीच पद्मश्री बावस्करांच्या अहवालाला केराची टोपली दाखवण्यात आली.या प्रकरणी ‘हॅलो बुलढाणा’ने सर्व प्रथम वृत्त मालिका सुरू ठेवली होती,तेच खरे ठरतेय हे विशेष!














