बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत सोनसाखळी चोरीप्रकरणी फरार आरोपीला अटक केली आहे. शिवनेरी नगरातील एक युवक (वय 32) याने चोरी करून फरार होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्यात आला.पोलीस स्टेशन बुलढाणा शहर अंतर्गत Cr No 181/25, कलम 309(4) BNS नुसार दाखल गुन्ह्यात फिर्यादीची 1.5 तोळ्यांची सोन्याची चैन (90,000/- रुपये) चोरीला गेली होती. तपासात आरोपीकडून चोरीस गेलेली चैन, त्याने वापरलेली मोटारसायकल (70,000/- रुपये) आणि गुन्हा करताना वापरलेले टी-शर्ट असा एकूण 1,60,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI रवि मोरे आणि डीबी पथकाने अत्यंत शिताफीने ही कारवाई केली. या कारवाईत पोहेका संदीप कायंदे, महिला HC सुनीता खंडारे, पोका युवराज शिंदे, पोका मनोज सोनुने, पोका कौतिक बोर्डे, पोका विनोद बोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.बुलढाणा शहर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला चोख प्रत्युत्तर देण्याचा पोलिसांचा निर्धार यामुळे अधोरेखित झाला आहे