खामगाव (हॅलो बुलडाणा) खामगावच्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेत मराठी न बोलणाऱ्या मॅनेजरविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. बिहारमधील तिवारी हे मॅनेजर मराठीत संवाद साधत नसून केवळ हिंदीत बोलतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.शेतकऱ्यांच्या घरकुल योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि लाडकी बहिण योजनेतील पैसे परस्पर कर्ज खात्यात वर्ग झाल्याने अनेक शेतकरी तक्रार घेऊन मॅनेजरकडे गेले. मात्र, तिवारी यांनी मराठीत उत्तर देण्याऐवजी हिंदीत संवाद सुरूच ठेवल्याने शेतकरी संतापले.
अमोल पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बँकेतच जोरदार घोषणाबाजी केली. “तुम्हाला मराठी बोलायलाच हवं! नाहीतर परत जा!”अशा आक्रमक शब्दांत त्यांनी मॅनेजरला धारेवर धरले. जवळपास दीड तास बँकेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
मराठीतच संवाद व्हावा, या मागणीसाठी शेतकरी संघटना अधिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.