बुलढाणा (हॅलो बुलडाणा) क्रिकेट सट्टा याप्रकरणी आता चिखलीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कूप्रसिद्ध होत आहे.कारण काही लोकांना थायलंड येथे अटक करण्यात आले असून आज पर्यंत त्यांची सुटका झालेली नाही. त्यांना कुणाचा वरदस्त आहे?हे अनेकांना कळले असून हा किंगमेकर व बडा व्यापारी असल्याचे बोलल्या जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली सारख्या शहरात काय नाही ते बोलावं.. क्रिकेट सट्टा, क्लब, वरली मटका हे सुरूच आहे. जरी यांचे वागणे मांजराप्रमाणे असेल तरी सर्वांना ते दिसतेच. हे सुरू असतांना मात्र चिखली मधील तरुणांवर चक्क आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हे दाखल करून अटक करून तुरुंगाची हवा खाण्यास भाग पडणे, ही गोष्ट खरच चिंता वाढवणारी आहे.
११ जून २०२४ रोजी थाईलेंड मधील पटाया येथे तेथील चोनबुरी प्रांतीय पोलिसांनी सोई सुखुमवित ९१/२ मधील एका घरावर छापा मारून ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या जुगार अड्डा चालवणाऱ्या २१ भारतीय लोकांना अटक केली. या मध्ये १०० मिलियन थाई किंवा यापेक्षा अधिक रकमेचा घेवाण देवाण चे पुरावे तेथील पोलिसांनी हस्तगत केले. ५० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी जेव्हा या घरामध्ये दाखल झाले तेव्हा १० भारतीय लोक हे संगणकावर बैकारेट, पोकर, स्लॉट आणि खेळ जुगारासह विविध ऑनलाइन गेमिंग बद्दल फोन कॉलिंग करत असल्याचे दिसून आले. यावेळी याच घरातील वरच्या मजल्यावर काही तरुण आराम करत असल्याचे पोलिसांना आढळले. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले सर्व २१ तरुण हे भारतीय होते. यातील काही तरुणांकडे शैक्षणिक आणि पर्यटक व्हीजा होता तर इतर तरुणांकडे पासपोर्ट सुद्धा नव्हते. तर पटाया पोलिसांनी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात साक्ष सुद्धा जमा केले. ज्यामध्ये चार डेस्कटॉप कंप्युटर, आठ लैपटॉप, ५० पेक्षा अधिक मोबाईल फोन, असंख्य थाई सिम कार्ड, आणि तेथील भिंतीवर भारत, संयुक्त अरब अमिरात (दुबई) आणि थाईलेंड चा वेळ दाखवणारी तीन घडयाळी लावलेल्या होत्या. सोबतच तेथील भिंतीवत हिंदी भाषेत हाताने लिहिलेलं फलक होते ज्यामध्ये करावयाच्या कामाबद्दलची माहिती, विविध बैंकाचे अकाउंट नंबर आणि जुगाराचे नियम आदी लिहिलेले होते.
तर प्राथमिक चौकशी मध्ये पोलिसांना माहिती मिळाली की, ऑगस्ट २०२३ मध्ये ३० हजार थाई रुपयांमध्ये ते घर भाड्याने घेण्यात आले होते. तर यांचे काम फिलिपिन्स मध्ये स्थित सात ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या जुगारच्या वेबसाईटसाठी पैसे हस्तांतरण ची जबाबदारी सांभाळून त्यासाठी कॉल सेंटर सुद्धा चालायचे. तर यांमध्ये बहुतांश ग्राहक हे भारतीय होते तर काही दुबई चे होते. इथे प्रत्येक व्यक्ती हा आठ तास काम करायचा. तेथील पोलिसांच्या माहितीनुसार काही लोक न्यायिक पद्धतीने थाईलेंड मध्ये दाखल झाले होते तर अनेकांच्या पासपोर्ट ची अवधी समाप्त झाल्यानंतर देखील ते तेथे वास्तव्यास होते. तर छापा टाकला तेव्हा काही संशयित तेथून चोनबुरी मध्ये फरार होण्यात यशस्वी झाले. यावेळी सर्व संशयित लोकांची नावे तेथील प्रसासनाने काळ्या यादीत नावे समाविष्ट करून तेथून निर्वासित केले.
हा सर्व प्रकार जेव्हा थाईलेंड मधील पटाया न्यूज च्या माध्यमातून समोर आली तेव्हा सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा कळले की, अटक करण्यात आलेल्या २१ भारतीय लोकांमधील काही तरुण हे आपल्या चिखली मधील असल्याचे काही लोकांनी स्पष्टपणे सांगितले. एन तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हे दाखल होऊन तुरुंगात जावे लागले.
यात दोषी कोण – कोण ? हे माहिती सुद्धा विस्तृतपणे समोर येणारच. ही घटना ज्यावेळी घडली तेव्हा या क्षेत्राची माहिती ठेवणाऱ्या प्रत्येकाला होती की अशी घटना घडली म्हणून. चक्क चिखली सारख्या छोट्या शहरातून निघून विदेशात आपले बस्तान मांडण्याच्या स्वप्नापाई आज ते तरुण आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगार म्हणून समोर आले असून त्यांची सुटका कधी व केव्हा होणार ? तसेच भारतात आल्यावर त्यांचे काय ? हाच मोठा यक्ष प्रश्न समोर येत आहे. तर सहा इंचाच्या मोबाईलमध्ये सामावलेले जग शोधत असताना आपले मूल वाम मार्गाने तर जात नाही न.! याबद्दलची खात्री करणे आज प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. कमी कालावधीत पैसे कमावण्याचे त्यांचे स्वप्न योग्य की अयोग्य हे वेळीच त्यांना समजवणे महत्वाचे आहे. जे तरुण आज तेथे अटकलेले आहेत त्यांचे पालक चिंतातुर आहेत. पण आपला मुलगा पैसे कुठून, कसा आणत आहे याबद्दल साधी विचारपूस करणे महत्वाचे होऊन बसते. त्या मुलाने अमाप पैसा कमविला याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे हे आहे की, अमाप पैश्यापेक्षा अधिक प्रिय प्रत्येक पालकाला आपले पाल्य असतात आणि तो कसाही जरी असला तरी तो डोळयांसमोर असावा, हे महत्वाचे आहे.
क्रमशः














