चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) शहरातील पंचमुखी महादेव मंदिरासमोर काल रात्री ८:०५ वाजता थरारक घटना घडली. चालत्या टाटा एस गाडीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. अचानक आग लागल्याने वाहन चालक आणि परिसरातील नागरिकांसाठी हा क्षण जीवघेणा ठरू शकला असता.घटनेनंतर काही सेकंदांतच ज्वाळांनी रौद्ररूप धारण केले, मात्र स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने पाणी टाकून आग आटोक्यात आणली. या शौर्यपूर्ण कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागली असावी. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली