बुलढाणा (हॅलो बुलडाणा) क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी (घाटावरील) डॉ. ज्ञानेश्वर टाले यांची निवड करण्यात आली आहे. बुलढाणा येथे काल पार पडलेल्या बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला. संघटनेच्या स्थापनेपासूनच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या या संघटनेने अनुभवी आणि लढवय्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे.डॉ. टाले हे शेतकरी आंदोलनाचे अनुभवी नेतृत्व असून, त्यांच्या कार्यशैलीमुळे संघटनात्मक काम निश्चितच वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील शेतकरी चळवळीला नवा उर्जास्रोत मिळाला आहे. वाढत्या महागाई, अनियमित पाऊस, सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात संघटना अधिक आक्रमक भूमिका घेईल, असे संकेत या बैठकीत मिळाले.
डॉ. टाले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक जोमाने मांडले जातील आणि शासनाला धारेवर धरण्याचे काम केले जाईल. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीला टीम ‘हॅलो बुलडाणा’ कडून मनःपूर्वक शुभेच्छा!