बुलढाणा (हॅलो बुलडाणा) माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाले आणि बुलढाण्यात राजीनामा सत्राचा प्रारंभ झाला आहे.काँग्रेस नेते विजय अंभोरे यांनी काँग्रेसला रामराम करून पत्र परिषद घेतली. याचे कारण मात्र समजू शकले नाही.बुलढाण्यातील काँग्रेस नेते विजय अंभोरे यांची कार्यकर्त्यांवर मोठी पकड आहे.
मात्र त्यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिलाय.
1984 पासून कॉग्रेस पक्षात त्यांनी काम सूरू केले होते. विविध पदावर त्यांनी कार्याचा ठसा उमटवला.परंतु आता मात्र महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्यातुन राजीनामा दिला आहे.कॉग्रेसच्या प्रदेश उपध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा,असे काय झाले असेल?तर त्यांनी सांगितले की, वैयक्तिक कारणवरून हा राजीनामा दिला आहे. प्राथमिक सदस्यांचा राजीनामा सुद्धा त्यांनी दिला आहे. भविष्यात कुठल्या पक्षात जायचं कि नाही ते कार्यकर्ते सोबत चर्चा करून सांगू,असेही ते म्हणाले..!