जानेफळ (हॅलो बुलडाणा /अनिल राठोड) येथील प्रवाशांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. गावातील मुख्य रस्त्यावर बस निवाऱ्याचा अभाव असल्यामुळे प्रवाशांना उघड्यावर उभे राहावे लागत आहे. खामगाव, अकोला, अमडापूर, बुलढाणा आणि जालना अशा प्रमुख मार्गांवर प्रवास करणाऱ्यांना तासन्तास बसची वाट पाहताना उन्हात- पावसात त्रास सहन करावा लागत आहे.सर्वसामान्य प्रवासी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही याच समस्येला सामोरे जात आहेत. कॉलेज आणि शाळेसाठी प्रवास करणारी मुले-मुली हॉटेलसमोर किंवा रस्त्याच्या कडेला उभे राहण्यास मजबूर आहेत, यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने त्वरित पावले उचलून येथे बस निवारा उभारण्याची गरज आहे. अन्यथा नागरिकांचा रोष उफाळून येईल, आणि प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाऊ शकते.