बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राजकारणात बदल हा होत असतो..लोकसभा- विधानसभा निवडणुकी नंतरही राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू आहेत.अशी हालचाल बुलढाण्यात दिसून आली.मनसेचे राजजी तिवारी व प्राध्यापक अनिलजी वाघमारे यांचा भाजपात प्रवेश झाला. भाजपा बुलढाणा विधानसभा प्रमुख योगेंद्रजी गोडे यांच्या नेतृत्वात व मुन्ना बेंडबाल यांच्या नेतृत्वात दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची भाजपात इनकमिंग सुरूच आहे,असे आता म्हटले जात आहे.
आज बुलढाणा विधानसभा प्रमुख योगेंद्रजी गोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा माजी शहराध्यक्ष राजजी तिवारी व प्राध्यापक अनिलजी वाघमारे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर यांच्या हस्ते भाजपाचे रुमाल टाकून हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी भाजपा नेते बुलढाणा शहर सिध्दार्थ भैय्या शर्मा,भाजपा जिल्हा महामंत्री येशूभाऊ पाटील,भाजपा माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशभाऊ सिनकर,भाजपा नेते मुन्नाजी बेंडवाल,भाजपा युवा नेते नंदुजी लवंगे,माजी नगरसेवक नारायणजी हेलगे,भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष सय्यद आसिफ भाई,नितीनजी बेंडवाल,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मोताळा प्रविनजी जवरे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सोहमजी झाल्टे,जिल्हा उपाध्यक्ष दत्ताजी घनोकार, उपसरपंच श्रीकृष्णजी इंगळे,भाजपा शहर उपाध्यक्ष नारायणजी तोंडीलायता,सचिनजी टेंभिकर,वैभवजी इंगळे,मिलिंदजी कुलकर्णी ,गणेशजी डुकरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.