सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा) येथील जिजामाता नगरमध्ये राहणाऱ्या संतोष शिंदे या युवकाचे अपहरण करून त्याला शेतात दाबून मारहाण केली.. त्याचा बेल्ट ने गळा आवळून संपवल्याची क्रूर घटना घडली. पुरावे नष्ट करण्यासाठी मोतीबाग तलाव ठिकाणी मृतदेह मोठ्या खड्ड्यात फेकून देण्यात आला.एक आरोपी अटक करण्यात आला आहे.परंतु इतर आरोपी मोकाट असल्याचा आरोप होतोय!
संतोष शिंदे याच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी अक्षय मेहेरे याला अटक केली आहे. दरम्यान ऑल इंडिया पँथर सेनेचे सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष भाई बजरंग काळे यांनी पीडित कुटुंबाला धीर दिला. ते म्हणाले की, कुटुंब भयभीत असून पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपीना अटक करावी..
आरोपीवर ऍट्रॉसिटी ऍक्टचे कलम लावावे.. अपहरण करणे, त्याला संपवणे आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने काही किलोमीटर बॉडी नेऊन फेकणे हे एक आरोपी करू शकत नाही. त्याच्यासोबत आणखीही आरोपी असल्याशिवाय हे शक्य झालेलं नाही…असाही त्यांनी आरोप केला.सरकारने पिडीत कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी, पीडित कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी द्यावी,अशी मागणी ही त्यांनी केली आहे.या घटनेचा निषेध देखील नोंदविण्यात आला.