(हॅलो बुलडाणा) बुलडाणा ‘हा दावा न व्यर्थ ही बढाई.. जिंकणार आहे मीच उद्याची लढाई’.. असे कोण म्हणत असतील बरं? निश्चितच लोकसभेत पराभूत झालेले उमेदवार! इतरही इच्छुक उमेदवार हे म्हणत असतील पण त्यांना सध्या तरी अधोरेखित करता येत नाही. पराभूत उमेदवारांना पडलेली मते ही डोळे विस्फाणारी आहे. शिंदे गट शिवसेनेचे खा. प्रतापराव जाधव यांचा लोकसभेत निसटता विजय झाला. त्यांच्या पाठोपाठ उबाठा शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर व शेतकरी नेते रविकांत तूपकर यांनी मिळवलेली मते आगामी विधानसभेचे निश्चितच गणित बिघडवू शकतात, अशी राजकीय चर्चा आहे.बुलढाण्यात उद्धवसेनेचे नरेंद्र खेडेकर विजयापासून अवघ्या सुमारे 29 हजार मतांनी मागे राहिले, तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी अन्य काही पक्षीय उमेदवारांपेक्षा अधिक तब्बल सुमारे अडीच लाख मते घेतलीत. बुलढाण्याच्या जागेवर महायुतीच्या उमेदवारांना यश लाभल्याने एनडीए सरकारच्या माध्यमातून येथील विकास कामांना वेग येण्याची आशा पल्लवीत झाली आहे. मात्र पराभूत उमेदवारांची मते दुर्लक्षित करता येणार नाही.आता आगामी विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले.
या विधानसभा निवडणुकीत विजयराज शिंदे, जयश्रीताई शेळके, रविकांत तुपकर, दिलीप जाधव, हर्षवर्धन सपकाळ, योगेंद्र गोडे, संजय राठोड, जालिंदर बुधवत, टी. डी अंभोरे, मधुसूदन सावळे, नरेश शेळके, संजय हाडे, (कीर्तीताई पराड- ध्रुपदराव सावळे यांची कन्या), सतीश पवार, संदीप शेळके, मोहम्मद सज्जाद अशी बरीच मोठी लिस्ट आहे. परंतु मतदारांच्या मते,बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जर महाविकास आघाडी कडून जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी मिळाली तर ‘एक नारी सभ पर भारी’ असे समीकरण होणार किंबहुना मतदार संघातील प्रथम महिला उमेदवार म्हणून त्यांनी लढत दिली तर ती अटीतटीची होणार आहे. रविकांत तुपकर ही टक्कर देऊ शकतात! विजयराज शिंदे यांनी मागील तीन टर्ममध्ये केलेली विकास कामे व लोकप्रियता व त्यांचा दांडगा जनसंपर्क बघता त्यांनाही संधी मिळू शकते.समाजभूषण दिलीप जाधव हे देखील टक्कर देऊ शकतात.
▪️संजय गायकवाड जयश्रीताई शेळके विजयराज शिंदे यांच्यात तिरंगी लढत?
शिंदे गटाकडून आ. संजय गायकवाड यांचा बुलढाणा मतदारसंघात केलेला विकास पाहता त्यांनाही पुन्हा एकदा मतदार कौल देऊ शकतात. शिवाय माजी आमदार विजयराज शिंदे यांचे कार्य पाहता त्यांनाही लोक निवडून देऊ शकतात तसेच जयश्रीताई शेळके यांची लोकप्रियता पाहता त्यांच्याही पदरात मते पडू शकतात.
▪️मागील मतदानावर दृष्टीक्षेप..
संजय रामभाऊ गायकवाड
67,785 मते
26,075 आघाडी
37.83% मते
विजयराज हरिभाऊ शिंदे
वंचित बहुजन आघाडी
41,710 मते
23.28% मते
हर्षवर्धन सपकाळ
INC
31,316 मते
17.48% मते