बुलढाणा (हॅलो बुलडाणा) 19फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘महामानव ग्रुप बुलढाणा’ च्या वतीने गोरगरीब गरजू रुग्णांसाठी “दोन मोफत रूग्णवाहिका” देण्याचे पवित्र कार्य शिवजयंती दिनी करण्यात आले.
सामाजिक कार्यामुळे जिल्हाभरात प्रसिद्ध असलेला व सामाजिक भान असलेला सर्वजाती धर्माच्या युवकांचा एकमेव हक्काच संघटन म्हणून “महामानव ग्रुप बुलढाणा” हा परिचित आहे. गरीब रुग्णांची होणारी हेळंसाड ,आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णवाहिका सुद्धा वेळेवर मिळत नसल्याचे वाईट अनुभव वारंवार येतात. पण त्यावर कुठेतरी निर्बंध लागावेत अनेकांचे जीव वाचावे प्रत्येकाला वेळेवर उपचार मिळावे या उदात्त भावनेतून प्रेरित होऊन महामानव ग्रुप ने आरोग्य क्षेत्रात कृतीयुक्त पाऊल टाकून मोफत रुग्णवाहिका सेवा देण्याचे कार्य हाती घेतल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. शिवजयंती निमित्त स्थानिक सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे घेतलेला कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला. महामानव ग्रुपच्या दोन रुग्णवाहिकेंच्या लोकार्पण सोहळ्याला सामाजिक राजकीय वैद्यकीय शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या दिग्गजांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. कार्यक्रमाचे सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व महामानवांच्या च्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महामानव ग्रुपचे अध्यक्ष सुमितभाऊ गायकवाड यांनी केले.
लोकार्पण सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संजुभाऊ गायकवाड म्हणून लाभले. कार्यकमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसारी,उद्योजक अमोलजी हिरोळे, डॉ. निकाळे, डॉ.प्रशांत पाटील साहेब, API राजपूत, समाजसेवक निलेशजी भुतडा, सुंदरखेड सरपंचा अपर्णाताई राजेश चव्हाण, मुख्याधिकारी गणेश पांडे,मोरे पेट्रोलियमचे सर्वेसर्वा तेजरावजी मोरे, तसेच विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली.














