बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवजन्मोत्सव बुलढाणासह जिल्ह्यात धुमधडाक्यात साजरा झाली. सकाळपासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि आता भव्य मिरवणूक डोळ्यांचे पारणे फिटेल अशी आहे. बुलढाण्यात शिवरायांपुढे अश्वानेही मानाचा मुजरा घातलाय!बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील विविध ठिकाणी शिव जन्मोत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात आला.
देशातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बुलढाणा शहरात बांधण्यात आलेले आहे. या ठिकाणी अनेक शिवभक्त सकाळपासूनच येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत होते. अशातच योगीराज नावाच्या अश्वानेदेखील या मंदिरासमोर येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक झाल्याचं बघायला मिळाले..जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिवजयंती दणक्यात साजरी झाली असून,याचा आनंद शिवप्रेमी, नागरिक घेताला आहे.