spot_img
spot_img

सौभाग्याचे लेणे जातेय चोरीला! -बुलढाणा बसस्थानक बनले चोरांचा अड्डा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सौभाग्याचे प्रतिक असलेल्या मंगळसूत्रावर स्थानिक बसस्थानकावर अनेक चोरट्यांचा डोळा असतो. महिला प्रवासी बसमध्ये उतरत असताना किंवा चढताना या मौल्यवान वस्तूंवर हातसाफ करत असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. काल 26 जूनला देखील बस स्थानकावर एका महिलेचे 30 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले आहे. परंतु पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून,अंजली पवार रा. चिखली या आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.

बुलढाणा मुख्यालय असल्याने येथील बस स्थानकावर हजारो प्रवाशांची वर्दळ असते. बस मध्ये प्रवास करणाऱ्याची संख्या लक्षणीय आहे. बस मध्ये महिलांना तिकिटामध्ये 50 टक्क्याची सूट मिळाल्याने महिलांची तोबा गर्दी दिसून येते. याच गर्दीचा फायदा घेत अनेक भुरटे चोर आपली संधी साध्य करतात. प्रवाशांना येथे अनेक वेळा आर्थिक फटका सोसावा लागला. अनेकांचे पैशांचे पाकीट मारले गेले. तर महिलांच्या मंगळसूत्र चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. विशेष म्हणजे येथे स्थानकाचे सिक्युरिटी गार्ड आणि पोलीस कर्मचारी तैनात असतात की नाही? हा प्रश्न विचारला जात आहे.26 जूनला देखील अशी घटना घडली. बुलढाणा येथील महिला शुभांगी खरात मेहकर येथे जाण्यासाठी बस स्थानकावर साडेबाराच्या दरम्यान थांबली होती. त्यांच्या गळ्यात 30 हजार रुपये किमतीचे दोन डोरले असलेले मंगळसूत्र लंपास करण्यात आले. मात्र या गुन्हेचा शोध तात्काळच लागला. मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अंजली पवार राहणार चिखली असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिच्यासोबत आणखी कोण महिला या चोरीच्या घटनेत सहभागी होत्या त्याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!