spot_img
spot_img

जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचा निर्णय – प्रगट दिनासाठी विशेष सुट्टी जाहीर! – जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये राहणार बंद!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या प्रगट दिनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यांच्या अखत्यारित असलेल्या तीन सुट्ट्यांपैकी एक सुट्टी प्रगट दिनासाठी देण्यात आली आहे.विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लाखो भाविक महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला येतात. यंदा 20 फेब्रुवारी उद्या प्रगट दिन साजरा होणार असून त्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली

यासोबतच 30 एप्रिलला अक्षय तृतीया आणि 1 सप्टेंबरला जेष्ठ गौरी पूजन या दिवशीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी 2 जानेवारी रोजी यासंबंधी आदेश जारी केला. शेगाव संस्थानच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत चोख व्यवस्था केली जाते. प्रगट दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!