बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) या नव्या गुंतागुंतीच्या आजारामुळे देशभर भीतीची लाट आहे. हा संसर्गजन्य रोग आहे का? या भीतीमुळे राज्यसह बुलढाणा जिल्ह्यातील यात्रा उत्सव रद्द होतील का? असा प्रश्न केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना विचारला असता,त्यांनी सूचक विधान केले.
दूषित पाणी व शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. पण, शिळे अन्न टाळून पूर्ण शिजलेले अन्न खाल्ल्यास आणि पाणी उकळून पिल्यास या आजाराचा धोका होत नाही, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान ना.प्रतापराव जाधव म्हणाले की,राज्यभर आरोग्य यंत्रणा सक्रिय आहे. गर्दीमुळे किंवा संसर्गजन्य हा रोग असल्यास उपचारासाठी आरोग्य खातं तत्पर आहे. वेळप्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातील यात्रा उत्सव रद्द करण्यात येईल!असे सूचक विधान जाधव यांनी केले.