बुलढाणा (हॅलो बुलडाणा) “वाहने सुसाट..नियम चाकाखाली! ‘कायदेशीर’ब्रेक कधी लागेल?”असा प्रश्न ‘हॅलो बुलढाणा’ ने काल शिव वाहतूक सेनेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनच्या माध्यमातून उपस्थित केला होता.दरम्यान वृत्त प्रसारित होताच काल विनापरवाना आणि कागदोपत्री पूर्तता नसलेली 35 अवैध वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.आज हा आकडा फुगण्याची शक्यता आहे.
शिवसेना प्रणित शिव वाहतूक सेना ने जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यात विनापरवाना व कागदांची पूर्तता न केलेली वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे म्हटले होते.वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नसल्यास सदर वाहने शासन जमा करण्याची आग्रही मागणी करीत आंदोलनाचा इशारा ही दिला होता.याबाबत ‘हॅलो बुलढाणा’ ने सर्वप्रथम सडेतोड वृत्त प्रसारित करून पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. शिव वाहतूक सेनेने निवेदनात म्हटले होते की,
बुलढाणा जिल्ह्यातील काळी-पिवळी, वाहतुक ऑटो रिक्शा, स्कुल बसेस व इतर बरेचशी वाहने विनापरवाना कागदोपत्री पुर्तता नसलेली वाहने सर्रास धावताहेत. अशा ब-याचशा वाहनांचे आजपर्यंत अपघात सुद्धा झालेले आहेत. त्यामध्ये अनेक नागरीकांची जिवीत हानी झाली.. कायम स्वरुपी अपंगत्व सुद्धा आलेले आहे.अशा वाहनांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता सर्रास ही वाहने परत जिल्ह्यातील वाहतुकीसाठी रोडवर सुसाट वेगाने पळताहेत, या सर्व बाबींना जबाबदार जिल्ह्यातील परीवहन कार्यालयातील अधिकारी तसेच जिल्हा पोलीस वाहतुक कार्यालयातील सर्व वाहतुक कर्मचारी यांचे संगणमत असल्यामुळे हा प्रकार सर्रास सुरु असल्याचा आरोप शिव वाहतूक सेने ने केला होता. बुलढाणा आर. टी ओ,अधिकारी- कर्मचारी झोपेत आहे. व शहरातील ट्रॅफीक पोलीस
यंत्रणा फक्त नावापुरत्या शासकीय ड्युट्या करीत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला होता.
येत्या २४ तासाच्या आत कारवाई करण्यात यावी,अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र उपोषण करण्यात येईल असा इशारा,शिव वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेश मुंगळे यांनी दिला होता.दरम्यान निवेदनाची व ‘हॅलो बुलढाणा च्या’ वृत्ताची दखल घेण्यात येऊन 35 वाहने जमा करण्यात आली आहे.