बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या कारकिर्दीत भुरट्या चोरांनी नागरिकांना हैराण करून सोडले आहे. तब्बल 6 महिन्यात 70 दुचाकी यांची चोरी झाली आहे. बुलढाणा शहर ठाण्यात 1 जानेवारी ते 23 जून 2024 दरम्यान ८४ चोरीच्या घटना घडल्या आहेत. यातील काही नाममात्र चोरांचा शोध लावण्यात पोलीस यशस्वी देखील झाले. परंतु मोकाट फिरणाऱ्या इतर चोरट्यांना कधी बेड्या ठोकणार ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बुलढाणा शहरचा वाढता विस्तार बघून पोलिसांचे संख्या बळ नसल्याने गुन्हेगारीला उत येत आहे.त्यामुळे दिवसाढवळ्या मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत आहे यात होंडा,शाईन,पल्सर स्प्लेंडर व बजाज या गाड्यांना चोरांकडून अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. मागणी तसा पुरवठा या सूत्रानुसार गतिमान पल्सर मोटर सायकल सध्या त्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून मोटारसायकल पार्क करावी असे आवाहन पोलिसांमार्फत केले जात आहे.या भागांमध्ये गेल्या काही मिहन्यांपासून मोटर सायकल चोरांचा सुळसुळाट झाला असून रस्त्यावर असो वा इमारतीच्या आवारात, बसस्थानक वा महाविद्यालयात असो अथवा शाळेत,किव्हा शासकीय कार्यालय त्यांच्या निशाण्यावर असलेली गाडी ते सहजासहजी उडवत आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी याकडे लक्ष वेधून नाठाळांच्या माथी काठी हाणावी, अशी मागणी होत आहे.