बुलढाणा (हॅलो बुलडाणा) खरे सोने देण्याचे आमिष दाखवून 9 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन नकली सोने दिल्याची घटना अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे.युवराज अजबराव चव्हाण 28 रा.दर्गा पराड तालुका अंबड जिल्हा जालना असं या आरोपीचे नाव आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली. आरोपी विरोधात अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये 10/25 कलम 318 (4), 3 (5) बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखला होता.याप्रकरणी तांत्रिक विश्लेषण करून तपास करण्यात आला. दरम्यान आरोपीला पकडण्यात आले. आरोग्य कडून नकली सोन्याचे फोटो व्हाट्सअप वर पाठवण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यातआला आहे.शिवाय आणखी दोन मोबाईल व एक खोटे सिविल कॉन्ट्रॅक्टर विजिट कार्ड चा बॉक्स आणि पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी आरोपी कडून जप्त करण्यात आली आहे.सदर तपास एपीआय संजय मातोंडकर,पीएसआय दत्ता नरवाडे, विजेता पवार, ऋषिकेश थूट्टे, कोमल इंगळे,
चालक निवृत्ती पुंड,भगवान शेवाळे,शिवाजी सुरडकर, चंद्रशेखर मुरडकर,ऋषिकेश खंडेराव या पथकाने केला आहे.