spot_img
spot_img

💥श्रद्धांजली! बुलढाण्यात निघाला स्व.स्नेहल चौधरीसाठी कॅन्डल मार्च! – ॲड.जयश्रीताई शेळके म्हणाल्या.. गुन्हेगाराला पाठीशी घालणे दुदैवी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भरदिवसा एका दूचाकीवरील माय लेकीला बेदाराकपणे बोलेरो धडक देते व 24 वर्षाच्या युवतीचा त्यात निष्पाप जीव जातो, हे दुदैव तर आहे शिवाय काही लोक प्रशासनावर दबाव आणून गुन्हेगाराला पाठीशी घालतात हे अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची चीड शिवसेना नेत्या ॲड. जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केली आहे.काल स्व. स्नेहल संदीप चौधरी हिला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी चांडक लेआउट ते त्रिशरण चौक दरम्यान कॅण्डल मार्च काढण्यात आला.याप्रसंगी जयश्रीताई शेळके बोलत होत्या. त्यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणीही केली आहे.

स्नेहल संदीप चौधरी रा. चांडक ले आऊट, सुंदरखेड बुलडाणा या युवतीचे 10 फेब्रुवारी रोजी अपघाती निधन झाले. तिच्या स्कुटीला एका मद्यधुंद बोलेरो वाहन चालकाने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. काल सायंकाळी 6 वाजता चांडक लेआउट ते त्रिशरण चौक कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे.दरम्यान आज स्नेहलताई उद्या कोण?, सरकार कोणासाठी?,निर्दोष मरतात गुन्हेगार मोकाट फिरतात..हे अन्यायाचं राज्य आहे का?असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.या कॅन्डल मार्चमध्ये असंख्य महिला मुली मुले वृद्धांचा सहभाग होता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!