spot_img
spot_img

परत शरद पवारांच्या विचाराचं वादळ घोंगावणार! – डॉ.राजेंद्र शिंगणेंना ‘फिनिक्स भरारीची’ आशा..

लोणार (हॅलो बुलढाणा) डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले की,परत शरद पवारांच्या विचाराचं वादळ जिल्ह्यात घोंगावणार आहे.

10 जून 1999 ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.तेव्हाच काही माणसे अशी चर्चा करायची की हा पक्ष किती दिवस चालणार आहे, काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित असलेला या पक्षाला भवितव्य तरी काय ? परंतु पवार साहेबांनी दोन महिने अगोदर स्थापन केलेला या पक्षाने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली.एक वेळ नव्हे तर अनेक वेळेस केले.केंद्रात देखील सत्तेत सहभागी झाला. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ,पासून अनेक सत्ता स्थान काबीज केलीत.अनेक चढ-उतार, पक्ष फुटी पाहिली तरी देखील पक्षाची वाटचाल चालूच आहे.मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला मिळालेल्या अपयशातून देखील पुन्हा नव्याने पक्ष फिनिक्स भरारी घेईल व जिल्ह्यात देखील शरद पवारांच्या विचारांचा संघटन आम्ही नव्याने निर्माण करू, असे मत राष्ट्रवादी नेते तथा माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी भवन ,बुलढाणा येथे बैठकी प्रसंगी केली केले. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी सौ रेखाताई खेडेकर जिल्हाध्यक्ष तर प्रमुख उपस्थितीमध्ये नरेश शेळके जिल्हा कार्याध्यक्ष ,साहेबराव सरदार माजी जिल्हाध्यक्ष ,भास्कर काळे प्रदेश उपाध्यक्ष तथा इतर नेते होते.
यावेळी प्रास्ताविक भाषणात नरेश शेळके यांनी सांगितले की पक्ष विभाजनानंतर लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात आपल्या पक्षाला 80 चा स्ट्राईक रेटने विजय मिळाला. विधानसभेत देखील कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत येणार असे अंदाज असताना महाविकास आघाडीचा पर अजय झाला . परिणामी आपल्या पक्षाला देखील मोठ्यापराभवाचा सामना करावा लागला. तरीदेखील आपल्या सर्वांचे नेते शरद पवार साहेब परत नवीन उमेदीने कामाला लागलेत. आपण सर्वांनी देखील या संकटाला संधी म्हणून पाहिलं पाहिजे व जीवाभावाचे नवीन निष्ठावान कार्यकर्ते पक्षाला जोडून नवीन मजबूत संघटन उभे करण्याचा संकल्प करूया. कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकरांनी देखील कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणीच्या माध्यमातून संघटनेमध्ये चांगल्या कार्यकर्त्यांचा समावेश करावा अशी सूचनात केली.
यावेळी साहेबराव सरदार, भास्करराव काळे, अभय चव्हाण ,डॉ.ज्योतीताई खेडेकर, वनिता गायकवाड, शेख साबीर, गजानन चित्ते, मोहन पाटील, डॉ शरद काळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.यावेळेस अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेबाबत सूचना केल्या
यावेळी संतोषराव रायपुरे, संगीतराव भोंगळ ,पांडुरंग दादा पाटील, गंगाधर जाधव, बीटी जाधव ,रफिक शेठ, अनिता शेळके ,लक्ष्मी शेळके , अनिल वर्मा, आफताब खान ,तुळशीराम दादा काळे अनिल बावस्कर ,सत्तार कुरेशी, रामदास शेठ भोंडे ,सुनील सोनवणे ,नसीम शेठ, कबीर भाई ,रामराव नाईक ,भगवानराव शेळके, गणेश कोरके, प्रभाकर काळवाघे, दीपक मस्के , संदीप मापारी पाटील.रवींद्र तोडकर ,राजूभाऊ जावळे ,अरुण मोगल ,, राजाभाऊ राहटे ,सदानंद तेजनकर ,सुरेश बोंद्रे गणपत गजानन वायाळ ,बाळासाहेब पवार, गजानन चेके रवी इंगळे, गजानन पवार ,अतुल लोखंडे, प्रमोद सपकाळ यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संचलन पी एम जाधव यांनी केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!