spot_img
spot_img

💥BREAKING! बुलढाण्यात मोठा राजकीय भूकंप: – मुन्नाजी बेंडवाल,सुरेश सिनकर,नंदू लवंगे यांच्या हातात ‘कमळ’

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात आज राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. विविध पक्षांतील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे महसूल मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण घडामोडीत जि.प. सदस्य सुरेश सिनकर, माजी शिवसेना शहर प्रमुख मुन्नाजी बेंडवाल, ऑल इंडिया मल्हार युवा संघटना अध्यक्ष नंदू लवंगे, नारायणजी हेलगे, विशालजी सोनुने, मिलिंद कुलकर्णी, निलेश आवडकर, शुभम सिनकर यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

प्रवेश सोहळ्याला भाजपा नेते डॉ. संजयजी कुटे, कामगार मंत्री ना. आकाशदादा फुंडकर, भाजपा बुलढाणा विधानसभा प्रमुख योगेंद्रजी गोडे, भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ आणि इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. ना. बावनकुळे यांनी पक्षाचे रुमाल टाकून सर्वांचा पक्षात स्वागत करत आगामी निवडणुकांसाठी या प्रवेशाचे महत्त्व अधोरेखित केले.

भाजपाच्या या आक्रमक पावलामुळे आगामी स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यात पक्षाचे बळ वाढणार असल्याचा विश्वास योगेंद्रजी गोडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. या ऐतिहासिक प्रवेश सोहळ्याने बुलढाण्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असल्याचे दिसत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!