लाखनवाडा (हॅलो बुलडाणा /सहदेव वाकोडे) पाण्याशिवाय जगणं कसं शक्य आहे? शिवाय आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून, ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.दरम्यान गत दोन महिन्या पहिले लाखनवाडा ग्रामपंचायतने गावातील विहीरीचे खोलीकरण केले खरे पण पाण्याचा थेंबही उपलब्ध झाला नाही. त्यामुळे विहीर खोलीकरणाचे पैसे पाण्यात गेल्याचे दिसून येत असून,ग्रामपंचायतीने विहीरीत अर्थपूर्ण डूबकी तर मारली नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन महिने अगोदर लाखो रुपये खर्च करून गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याकरिता ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतच्या मालकीची रायदर धरणाखाली असलेल्या विहिरीचं खोलीकरण करून गावाला पाणीपुरवठा व्हावा याकरिता काम करून घेतले असता आज मात्र दीड महिना उलटून गेल्यानंतर विहिर ही कोरडी झाली आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे ग्रामस्थ चर्चा करीत आहेत. याबाबत ग्राम विकास अधिकारी मोरे यांच्याशी संपर्क साधला असता मार्च अखेर जल जीवन पाणीपुरवठ्याची पाईपलाईन पूर्ण होत असून मुबलक पाणी गावाला मिळेल अशी माहिती दिली.परंतु ग्रामस्थांना पाणी किंवा उपलब्ध होईल?हा प्रश्न निर्माण झाला आहे.