बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जानेवारी महिना संपताच विद्यार्थ्यांना ओढ लागलेली असते ती 12 वीच्या परीक्षेची! विद्यार्थ्यांकडून 12 वीच्या परीक्षेची तयारी देखील जोमाने सुरू असते, आता आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत असून 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2015 कालावधीत होणार बारावीची परीक्षा होत आहे.
यंदाच्या वर्षी परीक्षेत इयत्ता बारावीचे अमरावती विभागात एक लाख 52 हजार 982 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. 542 केंद्रावर ही परीक्षा संपन्न होणार आहे.तसेच दहावीची 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान परीक्षा होणार असून या परीक्षेत एक लाख 64 हजार 48 विद्यार्थी प्रविष्ट आहेत.721 केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.
शासन,प्रशासन,पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेता, सर्वतोपरी प्रयत्न करून उत्तम कामगिरी करा, गैरप्रकार टाळावा, भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय सचिव नीलिमा टाके यांनी ‘हॅलो बुलढाणा’शी बोलताना केले आहे.