बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत असून, आत्मसंरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान गाडगे नगरात महिला व मुलींसाठी लाठी काठीसह आत्मसंरक्षण व बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
महिला व मुलींना आत्मसंरक्षण करता यावे म्हणून त्यांना लाठीकाठी, तलवार, छुरीया, कराटेची प्रथम पद्धती शिकवल्या जाणार आहे. शिवाय मुलींना बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी काही बौद्धिक खेळ,मैदानी खेळ, प्राणायाम, योगासने, सहज सोपे करता येण्यासारखे व्यायाम,सुर्य नमस्कार, अनुभवी महिलांचे मार्गदर्शन, एकात्मता स्तोत्र, गीत,शाररीक व वैचारिक सुदृढता यावी यासाठी एकत्रित येण्यासाठी दर रविवारी सकाळी आठ ते नऊ या वेळेत गणपती मंदिर मैदानावर, गाडगे महाराज नगर,चांडक ले आउट चिखली रोड बुलढाणा येथे सहभाग द्यावा हे सर्व कार्य अगदी विनामुल्य आहे .
यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाही. मुली व महिलांनी सौ अंजली देशमुख मो ८९७५९८५१६३ व सौ तेजस्विनी गोडबोले मो८८०५०१८८२१ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.










