बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्यातील एक महिला वस्तीगृह नियम धाब्यावर बसवून मनमर्जी कारभार करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.दरम्यान जिल्हाकार्यालयामार्फत या वस्तीगृहाच्या नियमबाह्य कार्याचा अहवाल आयुक्तालयाला प्राप्त झाला असता, आयुक्तालयाने या वस्तीगृहाच्या त्रुटींची यादीच समोर ठेवली असून कडक ताशेरे ओढले.. शिवाय त्रुटी पूर्तता अहवाल 8 दिवसाच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
बुलढाणा शहरातील रामनगर सागवान परिसरात डॉ.पंजाबराव देशमुख प्रतिष्ठान संचालित श्रीमती द्वारकाबाई चवरे नोकरी करणाऱ्या महिलांचे वस्तीगृह आहे.सदर वस्तीगृह नियम धाब्यावर बसवून मनमर्जी कारभार हाकत आहे.दरम्यान जिल्हा कार्यालय मार्फत आयुक्तालयाला वस्तीगृहाच्या नियमबाह्य कारभाराभातील तपासणी अहवाल पाठविण्यात आला असता, आयुक्तालयाने वस्तीगृहाच्या व्यवस्थापनावर कडक ताशेरे ओढले आहेत.आयुक्तालय म्हणाले की,
डॉ.पंजाबराव देशमुख प्रतिष्ठानद्वारा
संचालित श्रीमती द्वारकाबाई चौरे नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहात अनेक त्रुटी आहेत. संस्थेने आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली नाही. वसतिगृहामध्ये निकषानुसार प्रवेश दिला जात नाही.व्यवस्थापन समिती गठित करण्यात आलेली नाही.
वसतिगृहात ३९ प्रशिक्षणार्थी मुली आणि एकच नोकरी करणारी महिला निवासी आहे. याशिवाय वसतिगृहाचे कामकाज मार्गदर्शक सूचनांनुसार होत नाही.कर्मचारी संख्या अपुरी आहे. संस्थेने निकषानुसार दस्ताऐवज ठेवलेले नाहीत. स्वच्छता दिसून आली नाही. सदरील संस्था मुलींसाठी वसतिगृह म्हणून चालविण्यात येत आहे. सदर मुलींकडून दरमहा १ हजार ११०० व १४०० रुपये या प्रमाणे मासिक भाडे आकारण्यात येते. इतर कोणताही लाभ, सुविधा संस्थेकडून प्रवेशितांना दिल्या जात नाहीत. दरम्यान त्रुटी पूर्तता अहवाल 8 दिवसाच्या आत सादर करावा, असेही आयुक्तालयाने आदेशित केले आहे.










