बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा परिषदेत कै. त्र्यंबक भिकाजी पाटील (अंत्री-खेडेकर) , कै. पुंडलिकराव गावंडे (बोथा-काजी), कै.महादेवराव आळशी (माटरगाव) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ए.आर.अंतुले यांचे देखील नाव कोनशिलावर कोरले होते.परंतु
या कोनशीलाला जिल्हा परिषदेने झाकुन ठेवल्याचे दुर्दैव असल्याचे फेसबुक अकाउंट वरून राष्ट्रीय अध्यक्ष (राजीव गांधी पंचायती राज संघटन ) हर्षवर्धन सपकाळ यांनी अधोरेखित केले होते.याबाबत सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने बातमी प्रकाशित करताच अवघ्या दोन तासात सदर बॅनर हटवून कोनशीला मोकळी करण्यात आली.
कोनशीला झाकल्या गेल्याने सपकाळ यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंट वरून जिल्हा परिषद प्रशासनावर तोफ टाकून सडेतोड पोस्ट केली होती. बुलढाणा जिल्हा परिषद केवळ भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. हे दुर्दैव नाहीतर दुर्भाग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. या प्रकरणाचा त्यांनी धिक्कार करत जिल्हा परिषद प्रशासनाने झालेली चूक तत्काळ दुरुस्त करावी, ही मागणी केली होती. दरम्यान ‘हॅलो बुलढाणा’ ने ही बातमी प्रसारित केल्यानंतर यंत्रणा जागी झाली आणि झाकलेली कोनशीला मोकळी करण्यात आली.