spot_img
spot_img

💥आदेश! सह दुय्यम निबंधकपदी लिपिकाच्या नेमणुकीला मनाई! – दस्त नोंदणीचे काम ठप्प होण्याची शक्यता?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नोंदणी विभागातील सह दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक अशा जबाबदार पदांच्या रिक्तजागेवर खात्यातील वरिष्ठ वा कनिष्ठ लिपिकांच्या नेमणुका करू नयेत, असे आदेश राज्य शासनाने बुधवारी (दि.5) जारी केले.त्यामुळे बुलढाणा शहराबरोबरच राज्यातील अनेक उप निबंधक कार्यालयातील नोंदणीचे काम ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नोंदणी विभागात सह दुय्यम निबंधक वर्ग-2, सह जिल्हा निबंधक वर्ग-2 आणि मुद्रांक उप अधिक्षक या संवर्गात 260 पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल 85 पदे रिक्त आहेत.त्यामुळे नोंदणीची कामे खोळंबू नयेत या उद्देशाने या रिक्त पदांवर वरिष्ठ वा कनिष्ठ लिपिकांची नेमणूक करण्यात येत असे. त्याखेरीज रजेवर जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जागीही प्रतिनियुक्तीवर लिपिकांना पाठविण्यात येत असे. तथापि, शासनाच्या महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी सुनील जाधव यांनी बुधवारी जारी केलेल्या एका परिपत्रकाने अशा नेमणुकांवर बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यातील 85 दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण
झाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!