spot_img
spot_img

💥क्राईम! महिलेला मारहाण केली अन् गळ्यातील सोन्याची पोथ घेऊन पळाला! – चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या! – एक लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त!

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जामोद व सोनाळा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल करून, तब्बल 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्यात. काझी मजहरोद्दीन झुबेरोद्दीन 36 रा.राणी पार्क जळगाव जामोद असे या आरोपीचे नाव आहे.

हकीकत कशी आहे की,फिर्यादी शालू धम्मपाल दामोदर रा.खेडा खुर्द तालुका जळगाव जामोद ह्या 8 डिसेंबर 2024 रोजी शेतात जात असताना, आरोपीने त्यांचा रस्ता अडविला आणि मारहाण करून जबरदस्तीनेत्यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याचे मनी असलेली पोथ व मोबाईल घेऊन पोबारा केला होता. इतरांकडून देखील चार ग्रॅम सोन्याची पोत जबरीने चोरून नेली होती.या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने सदर चोरट्याला जेरबंद केले आहे.चोरट्या कडून सोन्याचे मणी व ईतर वजन 6.960 ग्रॅम किं. 42,000,एक मोटार सायकल 60,000, दोन मोबाईल असा एकूण 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

▪️या पथकाने केली कामगिरी! 

सपोनि. रुपेश शक्करगे, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, गणेश पाटील, चाँद शेख, पोकॉ. गोपाल तारुळकर चालक पोकॉ. पुंड स्था.गु.शा. बुलढाणा व पोहेकॉ. राजू आडवे, पोकॉ. ऋषीकेश खंडेराव तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा यांनी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!