लोणी बु. (हॅलो बुलडाणा/संदीप मापारी) तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील श्री गणेश पोतरे यांच्या शेतातील विहीरीत एक महिन्यापासून पडलेल्या 3 घोणस जातीच्या सापांना सकाळी दहा वाजता बाहेर काढून मोहजा बंदी येथील जंगलात सोडून दिले. तसेच दुपारी एक वाजता श्री अरुण पोफळे राहणार हिरडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा यांच्या शेतातील विहीरीत आठ दिवसांपासून पडलेल्या 2 घोणस जातीच्या सापांना सुरक्षित बाहेर काढून सापांबद्दलची संपूर्ण माहिती दिली, सर्पदंश कसे टाळता येतील तसेच सर्प दंश झाल्यावर काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले आणि सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले, यावेळी सापांना बाहेर काढण्यासाठी सर्पमित्र कमलेश आगरकर आणि ऋषिकेश घोटुळकर यांनी सहकार्य केले. कुठेही साप दिसून आल्यास घाबरून जाऊन त्याला न मारता सर्पमित्रांना बोलावून त्याला जीवदान द्या असे आवाहन सर्पमित्र विनय कुलकर्णी यांनी केले.
- Hellobuldana