बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पीककर्ज गतिमान होऊन शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेवर मिळावे या हेतूने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी आज दि २६ रोजी मोताळा तालुक्यातील मोताळा, शेलापुर, शेलगाव बाजार, पिंप्री गवळी, पोफळी, पिंपळगाव देवी, धामणगाव बढे, रोहिणखेड या गावातील राष्ट्रीयकृत बँकांना भेटी दिल्या. भेटी दरम्यान अनेक गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झाले नसल्याचे निदर्शनात आले. बँकेच्या व्यवस्थपकाशी चर्चा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे सांगितले.यावेळी व्यवस्थापकांनी सुद्धा पीककर्ज वाटपाची प्रक्रिया तात्काळ करण्यात येईल असा विश्वास दिला.यावेळी म आ जिल्हा संघटिका सौ चंदा ताई बढे, उप जिल्हा प्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, रामदास सपकाळ, शुभम घोंगटे, विजय इतवारे, राजु बोरसे, सुधाकर सुरडकर, ओमप्रकाश बोर्डे, रामशंकर सोनुने, मुकुंदा क्षिरसागर, लिंबाजी गायकवाड, संदीप शेळके, सरपंच यादव मोहाडे, प्रकाश पोकळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.