spot_img
spot_img

शासकीय कंत्राट राजकीयांच्या चेल्या – चपट्यांनाच! – आमदार व खासदारांचे कमिशन राज! – जितेंद्र जैन यांची मुख्यमंत्र्यांना तक्रार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) खरं तर शासकीय निविदा प्रक्रिया ही राजकीय दबावतंत्रामुळे चालते! हे सर्वश्रुत असून राज्यातील शासकीय निविदा प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप व दबावतंत्र थांबवण्याची गरज आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करणार कोण? असा प्रश्न निर्माण झाल्याने या संदर्भातील एक पत्र सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविले आहे.

जितेंद्र जैन यांनी म्हटले की,गेल्या काही वर्षात राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक मतदारसंघात शासकीय निविदा प्रक्रियेत आमदार आणि खासदार तसेच माजी आमदार, खासदार आणि त्यांचे स्वीय सहाय्यक नातेवाईक आणि पक्षांचे कार्यकर्ते यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेतील पारदर्शकता हरवत चालली असून मूळ कंत्राटदाराला बगल देण्यात येत आहे. कंत्राट राजकीय यांच्या निकटवर्ती यांनाच भेटतो.कारण राजकीय नेते पद्धतशीरपणे मूळ कंत्राट भरलेल्या कंत्राटदारांना धमकावतात.. यंत्रणेला हाताशी धरून आपला कंत्राटदार फिक्स करतात कारण त्यांना या कामात मोठे कमिशन मिळते.परिणामी पात्र-कंत्राटदाराला डावलल्या जाते आणि काम देखील गुणवत्तापूर्वक होत नाही शिवाय शासनाला वर्षाकाठी हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागते.त्यामुळे या प्रकरणी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी त्वरीत दखल घ्यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!