चिखली (हॅलो बुलडाणा) गांधी नगर परिसरात राहणाऱ्या आदित्य प्रशांत गुप्ता आणि केदार प्रशांत जैस्वाल यांच्यातील वाद पोलीस ठाण्यात पोहोचला होता. ‘मोटर सायकल सरका नही तो रिव्हाल्वरसे उडा दुंगा’ अशी धमकी देत जैस्वालने गुप्ताला मारहाण देखील केली होती.परंतु परस्परांनी तक्रारी वापस घेऊन तडजोड केली त्यामुळे वाद निवळला आहे. या प्रकरणाची सर्वप्रथम बातमी ‘हॅलो बुलढाणा’ ने प्रसारित केली होती हे विशेष! दोघांच्या या वादाने गेल्या काही दिवसांत खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल होण्यापासून पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत तक्रारींचा धडाका सुरू असतानाच अखेर प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाचा आपसी तडजोडीत शांततापूर्ण शेवट झाला आहे.
पक्ष क्र. १ आदित्य गुप्ता यांनी पक्ष क्र. २ केदार जैस्वाल यांच्या विरोधात IPC कलम ३५१ (२), २९६, आणि ११८(१) नुसार गुन्हा नोंदवला होता, तर केदार यांनीही प्रतितक्रार दाखल करून वाद चिघळला होता. मात्र, समाजातील वरिष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत या दोघांमध्ये समेट घडवून आणला. दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी उभय पक्षांनी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींंच्या उपस्थितीत एकमेकांविरोधातील सर्व आरोप मागे घेऊन वाद संपवण्याचा निर्णय घेतला. या तडजोडीनंतर दोन्ही पक्षांनी जाहीरपणे एकमेकांविरोधातील तक्रारी मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. या घटनेमुळे चिखलीतील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी हा वाद मिटवण्यात आलेला निर्णय अत्यंत सकारात्मक मानला जात आहे. ‘वाद मिटवा, शांतता प्रस्थापित करा!’ असा संदेश या घटनेने दिला आहे.या घटनेत ॲड. वाघमारे यांचे सहकार्य लाभले.