बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अमरावती विभागीय आयुक्त पदी डॉ. निधी पांडे यांच्या जागी भाप्रसे श्रीमती श्वेता सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ. निधी पांडे यांच्या रजेमुळे रिक्त झालेल्या जागेवर भाप्रसे सिंघल यांची नियुक्ती झाली.विशेष म्हणजे त्या बुलढाण्याच्या तत्कालीन एसडीओ राहिल्या असून, त्यांचा कर्तव्यातील बाणेदारपणा बुलडाणेकरांना चांगला माहित आहे.
श्वेता सिंघल यांनी आजवर आपल्या कार्यकाळात प्रशासनावर आपली घट्ट पक्कड ठेवली. त्या जिथे जिथे गेल्या तिथे विशेष करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध कारणांनी होणारी आंदोलने बऱ्यापैकी कमी करण्यात त्यांनी यश मिळवले होते.
दुष्काळ सचोटीने हाताळला तसेच अतिवृष्टी, अवकाळीने निर्माण झालेली पूर परिस्थिती त्यांनी यशस्वीपणे हाताळली. झालेल्या लोकसभा, विधानभेसह लोकसभेची पोट निवडणूक त्यांनी कोणताही वाद न होता कुशलतेने हाताळल्या.आता त्यांची अमरावती विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.त्यामुळे ‘विभागातील भ्रष्टाचाऱ्यांची आता गय केली जाणार नाही’,असे भाप्रसे श्वेता सिंगल यांच्या नियुक्तीमुळे बोलल्या जात आहे.