बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आपल्याकडे देवी – देवतांना नवस बोलण्याची प्रथा आहे. इच्छापूर्ती झाली की, नवस फेडला जातो. आमदार संजय गायकवाड विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी जनुना स्थित माँ भगवती सेवाधारी समितीच्या वतीने 101 श्रीफळ फोडण्याचा नवस करण्यात आला होता.. तो आज भक्तिमय वातावरणात पूर्ण करण्यात आला.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ग्राम जनुना येथे माँ भगवती सेवाधारी समितीच्यावतीने आमदार गायकवाड यांच्यासाठी विधानसभेमध्ये विजयासाठी 101 नारळाचा नवस करण्यात आला होता, तो नवस आज 4 फेब्रुवारी रोजी आमदार गायकवाड यांच्याहस्ते माता-भगवतीची महाआरती करून सेवाधारी समितीच्या तसेच ग्रामस्थांच्या साक्षीने पूर्ण करण्यात आला.
यावेळी तालुका प्रमुख धनंजय बारोटे,भाजपाचे सुनील देशमुख, अर्जुन दांडगे, नितीन ढोमणे, उपतालुका प्रमुख हरिदास कड, रामेश्वर ढेचरवा अध्यक्ष,गोपाल बारवाल, सतिष गवळी, रणजित चांदा, गजानन हिवाळे,राजु हिवाळे, सोनू इंगळे, सोनू गाडेकर, राजु राजपूत, किसन इंगळे, गणेश डांगर यांच्यासह शिवसेना,युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवाधारी समितीचे सर्व सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.