मेहकर (हॅलो बुलडाणा) मेहकर येथील एका व्यापाऱ्याने तब्बल एकुण 36,87,541 रुपयांची 752.70 क्विंटल सोयाबीन दिल्लीतील 5 जणांना विकली..रक्कम 5 दिवसात देण्याचे ठरले होते..मात्र व्यापाऱ्याला पाच जणांनी पैसे देण्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.
प्राप्त माहिती नुसार, व्यापारी दिनेश शंकरलाल अग्रवाल रा. जोहरमल चौक मेहकर यांचे मेहकरात श्रीनिवास ट्रेडिंग नावाचे अडत दुकान आहे. त्यांनी आरोपी दिनेश रामपाल शेरावत रा.129 गंगाराम पन्ना, कैर साउथ वेस्ट दिल्ली,केशव दिपक मित्तल रा. सी. 3 आचार्य
कृपलानी रोड, पि.एन.बी.ए.टी.एम. जवळ आदर्श नगर एक्सस्टेशन, आदर्श नगर नविन सब्जी मंडीजवळ माडल टाउन उत्तर
पश्चिम दिल्ली तसेच अजित दुबे व सुरेंद्र, दिपक मित्तल रा. सी.3, आचार्य कृपलानी रोड, नविन सब्जी मंडी जवळ माडल टाउन उत्तर पश्चिम दिल्ली यांना तब्बल एकुण 36,87,541 रुपयांची 752.70 क्विंटल सोयाबीन विकली होती.पूर्ण रक्कम 5 दिवसात देण्याचे ठरले होते.परंतु व्यापाऱ्याला पाच जणांनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत पैसे देण्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिली.दरम्यान व्यापाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपी विरुद्ध कलम 75/25 क. 420,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.










