spot_img
spot_img

💥BREAKING! ‘प्रयागराज’वरून येत असताना भेटले ‘यमराज!’ – समृद्धी महामार्गावर डूलकी..1 ठार,तर 4 जण गंभीर!

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा /संतोष जाधव) आज उपकेंद्र समृद्धी महामार्ग दुसरबीड या घटनास्थळी मोठा अपघात झाला.काचालकाला झोपेची डूलकी लागल्याने त्याचे स्टेरिंग वरचे नियंत्रण सुटले आणि तो थेट साईड बॅरेलला धडकून कारने दोन पलट्या मारल्याची बातमी हाती आली आहे.रूपाली नराळे (45) यामध्ये मृत्युमुखी पडली तर इतर 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई कॅरीडोर चायनल नंबर 320 +700 वर आज हा अपघात झाला आहे. कार क्रमांक MH20GE9085 कXUV 300 कार /चालक अक्षय भागवत नराळे वय 25 वर्षे प्रयागराज येथून संभाजीनगर येथे जात असताना चायनल नंबर 320+700 वर त्याला झोपेची डुलकी लागल्याने त्याचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार साईड बॅरेलला धडकून कारने एक दोन पलट्या मारल्या. हा अपघात एवढा भीषण घडला की,यामध्ये रूपाली नराळे वय 45 वर्ष यांचा मृत्यू झाला तर भागवत देविदास नराळे वय 55 वर्ष यांना किरकोळ दुखापत झाली. संजय खंडोबा पवार वय 65 वर्ष,मंगला संजय पवार वय 60 वर्ष सर्व राहणार संभाजीनगर यांना ॲम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथे रवाना करण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!